जोगेश्वरी पोलीस ठाणेकडुन बलात्कारासह पोक्सो कायदयातंर्गत दाखल गंभीर गुन्ह्यातील फरार घोषित आरोपीतास ०६ वर्षानतंर अटक केलेबाबत.

सहसंपादक – फयाज शेख..
जोगेश्वरी पोलीस ठाणे येथे गु.र.क्र.२७/२०१९ कलम ३७६, ३७६ (एन) (२), ३४ भादवि सह कलम ४,६,८,१२ पोक्सो या गुन्हयातील अटक आरोपी नामे पंकज प्रकाश पांचाळ, वय २७ वर्षे, धंदा-नोकरी, रा.ठी. रुम नवर- ०५, बशीर मोहम्मद चाळ, सुभाषनगर, जोगेश्वरी (पुर्व), मुंबई हा वर नमुद गुन्हयात जामिनावर होता. सदरचा आरोपी न्यायालयीन प्रक्रीयेदरम्यान मा. न्यायालयासमक्ष हजर राहत नव्हता. त्यामुळे वरील गुन्हयातुन जामीन मंजुर झाल्यापासुन मागील ०६ वर्षापासुन आरोपीत इसम हा स्वतःची ओळख लपवुन राहत होता.
मा. सत्र न्यायालय कोर्ट क्रमांक ११ दिडोंशी यांचेकडून जोगेश्वरी पोलीस ठाणेस स्थायी अजामीनपात्र वॉरंट बजावणी करीता प्राप्त झाले होते. त्यानुसार कार्यवाही सुरू होती परंतु आरोपी मिळुन येत नव्हता. दिनांक २२/११/२०२५ रोजी जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे सपोनि मिसाळ, गुन्हे प्रकटीकरण पथक पो.ह.क्र. ५९६८/कोरे यांना गुप्त बातमीदारांकडून सदरचा आरोपी हा नवलकरवाडी एस. आर.ए. बिल्डिंग जोगेश्वरी परिसरात आल्याचे खात्रीदायक माहिती मिळाल्याने नमुद पथकाने सापळा रचुन पकड्याचा प्रयत्न करीत असताना आरोपी हा पळून जावु लागला असता त्यास वरील पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले. तसेच त्यास पोलीस ठाणेस आणुन नमुद गुन्हयात अटक करून दिनांक २३/११/२०२५ रोजी मा. सत्र न्यायालय कोर्ट क्रमांक ११ दिंडोशी, मुंबई यांच्या समक्ष हजर करण्यात आले सदरचा आरोपीत हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.
जोगेश्वरी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना मागील ०६ वर्षापासुन फरारी आरोपीतास अटक करण्यास यश प्राप्त झाले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (का व सु), बृहन्मुंबई श्री. सत्यनारायण चौधरी, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. परमजित सिंह दहिया, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १० मुंबई, श्री. दत्ता नलावडे, सहायक पोलीस आयुक्त मेघवाडी विभाग, मुंबई संपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक इक्बाल शिकलगार, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि नागेश मिसाळ व पो.ह.क्र. ५९६८/कोरे यांनी प्रत्यक्ष पार पाडली.


