क्राईमताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजसामाजिक

सहकारनगर पोलीस स्टेशन कडुन सराईत गुंडावर एम.पी.डी.ए प्रमाणे कारवाई केलेबाबात.


मुख्य संपादक – जोसेफ नडेसन..

पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसविण्याकरिता मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी कडक पावले उचलली असून त्यासाठी पुणे शहरातील सराईत गुन्हेगारावर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश पुणे शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेले होते.

 

त्याप्रमाणे सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे चा गुन्हे अभिलेखावरील सराईत व अटट्ल गुन्हेगार नामे ऋषीकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे वय २६ वर्ष, रा गल्ली न. ७०, तळजाई वसाहत पदमावती पुणे याचे विरुद्ध सहकारनगर पोलीस स्टेशन येथे सन २०२३ सालापासुन आजपर्यंत गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय आहे. त्याचेविरुध्द मालमत्तेविरुध्द व शरिराविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन त्यामध्ये घातक हत्यारे जवळ बाळगुन दरोडा घालणे, मनाई आदेशाचा भंग करुन दहशत निर्माण करणे, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे, स्त्रिचा विनयभंग करण्याचे उद्देशाने तिचा पाठलाग करणे, तसेच सरकारी नोकरास त्याचे कर्तव्या, पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला करणे यासारखे एकुण ०५ गंभीर स्वरुपाच्या गुन्हयांचा समावेश आहे.

 

सराईत गुंड ऋषीकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे वय २६ वर्ष, रा गल्ली न. ७०, तळजाई वसाहत पदमावती पुणे याचेविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुनही त्याचे वागणुकीत काहीएक फरक पडलेला नव्हता. तो अत्यंत क्रूर, खुनशी व भांडखोर असुन तो लोकांमध्ये काहीना काही कुरापती काढुन मारहाण करुन गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत आहे. तेथील सर्वसामान्य, शांतताप्रिय नागरीकांना विनाकारण त्रास देवुन आपला गुन्हेगारी हेतु साध्य करीत आहे. तसेच बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगून लोंकामध्ये दहशत निर्माण केली आहे. त्याचे दहशतीमुळे व भितीपोटी त्याचेविरुध्द तक्रार देण्यास कोणीही पुढे येत नव्हते. त्याचे अशा कृत्यामुळे सर्वसामान्य नागरीकांचे मनात भिती निर्माण होवुन त्यांचे जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाला होता म्हणुन श्री. विठ्ठल शंकर पवार, सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी त्यास स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव सर्व्हेलन्स पथकातील पोलीस हवालदार विनायक एडके, पोलीस अंमलदार गोरख ढगे व हरिश्चंद्र चोरमले यांचेव्दारे तयार करुन मा. पोलीस आयुक्त सोो, पुणे शहर यांना सादर केला होता.

 

सदर प्रस्तावाचे अवलोकन करून मा. पोलीस आयुक्त सोो पुणे शहर यांनी जा.क्र/गुन्हे / पीसीबी / स्थानबद्ध /सहकारनगर/लोंढे/९९१ व ९९२/२०२५, दि.११/१२/२०२५ रोजी वर्धा मध्यवर्ती कारागृह, वर्धा येथे स्थानवदध करण्याचे आदेश केल्याने त्यास मा. हुजुर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कोर्ट क्र. ०८, शिवाजीनगर, पुणे शहर यांचे परवानगीने दि. १२/१२/२०२५ रोजी स्थानबद्ध आदेशाची येरवडा कारागृहामध्ये बजावणी केली व दि. १८/१२/२०२५ रोजी ऋषीकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे यास वर्धा मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी रवानगी करण्यात आली आहे.

 

सराईत गुन्हेगारा कडून अशा प्रकारे कोणताही अनुचीत प्रकार घडु नये या अनुषंगाने पोलीसांकडुन समाजकंटक व अट्टल गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले असुन त्याचेविरुध्द अश्या प्रकारच्या कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीसांनी दिले आहेत.

 

सदर कारवाई मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग, पुणे शहर, मा. श्री. मिलिंद मोहिते, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२ पुणे शहर, मा. श्री. धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विठ्ठल शंकर पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे व श्री. जयंत राजुरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनानुसार सहकारनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक गणेश कर्चे, फिरोज शेख, पोलीस हवालदार विनायक रामचंद्र एडके, अमोल पवार, पोलीस अंमलदार गोरख ढगे, हरिश्चंद्र चोरमले, मारोती नलवाड, यांनी केली आहे


Translate »
error: Content is protected !!