क्राईमताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजसामाजिक

हवेली तालुक्यामधील हातभटटीवाला इसम एम पी डि ए कायदयांतर्गत कारागृहात स्थानबध्द


मुख्य संपादक  – जोसेफ नदेसन..

मा.श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण हे पुणे ग्रामीण जिल्हयात सध्या चालु असलेल्या नगरपालीका व नगरीपरीषदा सन २०२५ निवडणुका, तसेच आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुका या स्थानिक स्वराज्य निवडणुका शांततेत व भयमुक्त वातावरणात निर्वघ्णपणे पार पडाव्यात यासाठी जिल्हयामधील अवैध शस्त्र बाळगणारे, अंमली पदार्थांची विक्री करणारे, अवैध्य वाळु व्यवसाय करणारे, अवैध हातभटटीची दारुची निर्मीती करणारे, अवैध हातभटटीचे दारुची चोरुन वाहतुक करणारे, अवैध दारुचे गुत्ते चोरुन चालविणारे, यांची गुंडगिरी मोडीत काढणेसाठी हातभटटीवाले रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, यांचेविरुध्द कारवाईचा बडगा उगारुन एम.पी.डि.ए कायदयांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण जिल्हयामधील पोलीस स्टेशनला दिलेले आहेत.

त्याप्रमाणे ऊरुळीकांचन पोलीस स्टेशन हददीमधील शिंदवणे ता. हवेली जि. पुणे येथे वास्तव्यास असलेला हातभटटीचे गावठी दारुची निर्मीती, विक्री व वाहतुक करणारा इसम नामे क्रिश जॉनी राठोड वय वर्षे २० रा. काळेशिवार, शिंदवणे ता. हवेली जि. पुणे यांचे विरुध्द यापूवी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ मधील तरतुदींचा भंग करुन शिंदवणे, काळेशिवार तसेच आसपासचे गावात वेगवेगळया ठिकाणी गावठी हातभटटी ची दारु तयार करण्याचे भटटीसाठी लागणारे कच्चे रसायन, लोखंडी ड्रम, लाकडे याचे सहायाने गावठी हातभटटीची दारुची भटटी लावली असताना, तसेच भटटी लावुन तयार झालेली गावठी हातभटटीचे दारुची विक्रीसाठी वाहतुक करणे, अवैध रित्या चोरुन दारुची भटटी लावणे, दारुची विक्री करणेच्या धंदयाबाबत कोणी तक्रार केल्यास तो त्या तक्रारदारास धमकावणे, यासारखे गुन्हे व तक्रार असल्यामुळे सदरचा इसम हा सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा आणत असल्यामुळे त्याचेविरुध्द ऊरुळीकांचन पोलीस स्टेशन येथे ५ गुन्हे दाखल होते. तो सराईत हातभटटीवाला होत असल्याने त्याचेविरुध्द एम पी डि ए कायदयांतर्गत कार्यवाही होणेकामी श्री. सचिन वांगडे, पोलीस निरीक्षक ऊरुळीकांचन पोलीस स्टेशन यांनी मा.श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांना प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाचे अवलोकन मा. पोलीस अधीक्षक साो, पुणे ग्रामीण यांनी करुन तो प्रस्ताव पुढील कार्यवाही करीता मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांचेकडे पाठविला होता.

मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे श्री. जितेंद्र डुडी साो, यांनी इसम नामे क्रिश जॉनी राठोड वय वर्षे २० रा. काळेशिवार, शिंदवणे ता. हवेली जि. पुणे याला सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा ठरेल अशा प्रकारची कृत्ये करण्यापासुन प्रतिबंध करण्याचे दृष्टीने त्यास महाराष्ट्र झोपडपटटीगुंड, हातभटटीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणा-या व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणा-या, बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर लॉटरी चालवणा-या आणि मानवी अपव्यापार करणा-या व्यक्ती, यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत मुख्य अधिनियम १९८१ चा (सुधारणा अधिनियम सन २०२५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९) अन्वये आदेश पगम/एम पी डि ए/एस आर /०८/०१/२०२५ दिनांक १२/१२/२०२५ अन्वये स्थानबध्द करण्याचा आदेश पारीत केला आहे.

मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे श्री. जितेंद्र डुडी साो यांचे स्थानबध्दतेचे आदेशान्वये इसम नामे क्रिश जॉनी राठोड वय वर्षे २० रा. काळेशिवार, शिंदवणे ता. हवेली जि. पुणे यास ऊरुळीकांचन पोलीस स्टेशकडील पोलीस निरीक्षक श्री. सचिन वांगडे, यांनी ऊरुळीकांचन पोलीस स्टेशनला नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन शोध घेवुन त्यास दिनांक १३/१२/२०२५ रोजी ताब्यात घेवुन मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे दाखल करुन स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी हि मा.श्री. संदीप सिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण मा. गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण मा. बापुराव दडस, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौड उपविभाग, दौंड, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, पोलीस निरीक्षक श्री. सचिन वांगडे, ऊरुळीकांचन पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक श्री. कांबळे, उरुळीकांचन पोलीस स्टेशन, सहा. पोलीस उपनिरीक्षक महेश बनकर, पो. हवा योगेश नागरगोजे, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, पो.हवा अजित काळे, सचिन जगताप, शैलेश लोखंडे, प्रवीण चौधर, निलेश जाधव, प्रशांत पवार, उध्दव गायकवाड, कमलेश होले पो.कॉ सागर बोत्रे, राजकुमार भिसे, बंडु बालगुडे ऊरुळीकांचन पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.


Translate »
error: Content is protected !!