क्राईमताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजसामाजिक

गुन्हे शाखा युनिट ६. पुणे शहर महिलांचे गळयातील मंगळसुत्र चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद


मुख्य संपादक  – जोसेफ नडेसन..

पुणे शहरात कोरेगाव मिमा येथे जयस्तंभास अभिवादनासाठी येणा-या भाविकांच्या गर्दीचा, तसेच बसस्टॉपवर व इतर गर्दीच्या ठिकाणी होणा-या बोरीच्या गुन्हयांना आळा घालणेबाचत मा. वरिष्ठांकडुन आदेशित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने युनिट ६ पथकाकडून अशा प्रकारचे गुन्हे करणा-या आरोपीच्या हालचालीवर लक्ष ठेवणे कामी युनिट ६ कडील पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरी. कांबळे, पोलीस अंगलदार कारखेले, मुंडे, साळवे, ताकवणे, व्यवहारे या पथकाने सातत्याने गोपनीय माहिती प्राप्त करुन युनिट ६ हद्दीत घडलेल्या गुन्हयांचे संकलन केले.

दि.१८/१२/२०२५ रोजी युनिट ६ कडील सहा. पोलीस निरी. कांबळे व पथकास मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी १) सुभाष चंद्रकांत जाधव, वय ३९ वर्षे, रा. शिरापुर धुमाळ, ता. शिरुर जि. बीड, व कालिकानगर जि. बीड. २) लहु संतराम गायकवाड, वय ३० वर्षे, रा. रायमोह ता. शिरुर जि. बीड, यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्यांचेकडून एकुण १६७ ग्रॅम वजनाचे एकुण २०,०४,०००/- रु किं. चे सोन्याचे दागिने जप्त करुन खालील ०६ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

१) वाघोली पो.स्टे. मु.र.नं. ५००/२०२५ भा.न्या.सं.क ३०३ (२)

२) लोणीकंद पो.स्टे. मु.२.नं. ०६/२०२५ भा.न्या.सं.क ३०३ (२)

३) लोणीकंद पो.स्टे. गु.रं.नं. ०७/२०२५ भा.न्या.सं.क ३०३(२)

४) लोणीकाळभोर पो.स्टे. गु.रं.नं. ३०६/२०२५ मा.न्या.सं.क ३०३(२)

५) हडपसर पो.स्टे, गु.रं.नं. १३०७/२०२४. मा.न्या.सं.क ३०३(२)

६) स्वारगेट पो.स्टे. मु.रं.नं. १८२/२०२५ भा.न्या.सं.क. ३०३(२)

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-६ कडील पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांचे सुचनेप्रमाणे सहा. पोलीस निरी. मदन कांबळे, पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखोले, नितीन मुंद्रे, बाळासाहेब सकटे, विनायक साळवे, सारंग दले, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, नितिन धाडगे, सोनाली नरवडे व प्रतिक्षा पानसरे यांनी केली आहे.


Translate »
error: Content is protected !!