यूनिट ०४, गुन्हे शाखा, पुणे शहर हरविलेले / गाहाळ झालेले एकुण २८,३५,०००/- कि.चे. २०९ हस्तगत मोबाईलचे केले वितरण

मुख्य संपादक – जोसेफ नडेसन..
दिनांक २७/११/२०२५ रोजी ११/०० ते १३/०० वा. दरम्यान रक्षा पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे पोलीस उप-आयुका, परिमंडळ ४, पुणे शहर यांचे वतीने नागरीकांचे हरविलेले गहाळ झालेले हस्तगत मोबाईल वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमामध्ये परिमंडळ कार्यक्षेत्रामधील एकूण १० पोलीस स्टेशन यांच्याकडे Central Equipment identity Register या पोर्टलवरून प्राप्त तक्रारीमधील तसेच पूर्ण शहर पोलीस Lost & Found या पोर्टलवरील तक्रारींमधील हस्तगत एकूण २०९ हरविलेले/गहाळ झालेल्या मोबाईलपैकी अंदाजे २८,३५,०००/- रु कि चे २०९ मोबाईल हजर असणा-या नागरीकांना मा अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील यांच्या हसते परत करण्यात आले.
उपस्थित नागरिकांनी “मोबाईलच्या किंमतीपेक्षा आमच्या भावना अनमोल आहेत, आमच्या आठवणी याच्याशी निगडीत आहेत, मोबाईल हे आम्हाला आमच्या जवळच्या व्यक्तीकडून भेट माणून आलेले आहेत, आमचा महत्याचा डेटा आमच्या मोबाईलमध्ये होता, हरविलेला मोबाईल परत मिळेल म्हणून आम्हाला अपेक्षा नव्हती, परंतु पोलीसांमुळे आमचे हरविलेले मोबाईल परतमिळाल्यामुळे आमचा पोलीस यंत्रणेवरचा विश्वास कढला आहे” अशा भावना व्यक्तकरुन पोलीसांचे आभार व्यक्त केले.
सदर कार्यक्रमास मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहरश्री मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंड श्री सीमय मुंडे, मा. सहा पोलीस आयुक्त, खडकी विभाग, श्री विद्याल दबडे, मा.सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या सह परिमंडळ ४ मधील १० पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार व मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते.


