क्राईमताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजसामाजिक

“खून करुन मृतदेह फेकून देणा-या बाप लेकास विमानतळ पोलीसांनी सहा तासात केले गजाआड “


मुख्य संपादक – जोसेफ नडेसन

दिनांक १८/११/२०२५ रोजी विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील लोहगाव स्मशानभूमी परिसरात एक अनोळखी महिलेचा मृतदेह मिळून आला होता. त्या अनुषंगाने लागलीच विमानतळ पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक, नितीन राठोड व तपास पथकातील स्टाफ यांनी घटनास्थळाला भेट देवुन आजुबाजुचे सीसीसीटीव्ही फुटेजची बारकाईन पाहणी केली. सीसीटीव्ही मध्ये लाईट बंद असलेली संशयास्पद रिक्षा दिसुन आली होती. त्या अनुषंगाने लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी आणि येरवडा या भागातील रिक्षा गेलेल्या सीसीटीव्ही कॅमे-याची पाहणी करण्यात आली होती तसेच सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारामार्फत आरोपी बाबत पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड यांना महिती प्राप्त झाली होती त्याप्रमाणे येरवड्यातील यशवंतनगर भागात गेल्यावर पोलीस आरोपींच्या घरापर्यंत पोहचले. सदर ठिकाणी इसम नामे रवी रमेश साबळे वय ३५ वर्ष यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करता त्याने त्याचे सोबत राहत असलेली महिला सुवर्णा पुर्ण नाव व पत्ता माहित नाही हीस तीन दिवसापूर्वी वीट आणि लाकडी दांडक्याने मारहाण करुन खुन करुन तिचा मृतदेह घरामध्ये लपवुन ठेवला होता. घरात आणि शेजारी दुर्गंधी पसरत असल्याने दिनांक १८/११/२०२५ रोजी पहाटे सदर महिलेचा मृतदेह त्याचे वडील नामे रमेश रामचंद्र साबळे वय ६५ वर्ष यांचे मदतीने रिक्षामध्ये टाकुन पहाटे लोहगाव स्मशानभुमी परिसरात फेकुन दिला होता. नमुद दोन्ही आरोपींना ताब्यात घेवुन त्यांना येरवडा पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले असुन, येरवडा पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ७७७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३, ३(५), २३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी रवी रमेश साबळे वय ३५ वर्ष हा येरवडा पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे.

सदरची कारवाई ही मा. श्री अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. श्री. सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त परि ०४ पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक संतोष शिंदे, पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड, मनोज बरुरे, पोलीस अंमलदार उमेश धेंडे, योगेश थोपटे, हरीप्रसाद पुंडे, ज्ञानेश्वर आवारी, लालु क-हे, गणेश इथापे, रुपेश पिसाळ, दादासाहेव बर्डे, पांडुरंग म्हस्के, राहुल जोशी, अंबादास चव्हाण, सागर कासार, अंकुश जोगदंडे, शैलेश नाईक, शंकर वाघुले, सचिन जगदाळे, बबलु भिसे यांचे पथकाने केली आहे.


Translate »
error: Content is protected !!