“टिपु पठाण टोळीमधील मोका गुन्हयामधील दोन पाहिजे आरोपीस गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर पथकाकडुन जेरबंद केलेबाबत.”

सहसंपादक – फयाज शेख..
पुणे शहरातील पोलीस स्टेशनचे अभिलेखावर असलेल्या पाहिजे/फरारी आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेणेबाबत मा. वरिष्ठांनी आदेशीत केलेले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर पथक पाहिजे/फरारी आरोपींचा शोध घेत होते.
काळेपडळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ४०४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२) (३() (४),१२६(२),१८९(२),१९०,३५२,३५१ (३),३२९ (३),६१ (२) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधि सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२). ३ (४) या गुन्हयामधील पाहिजे असलेले आरोपी १) साजीद झिब्राइल नदाफ, वय २७ वर्षे, रा.स नं ०५ वेताळबाबा वसाहत गाडीतळ, हडपसर, पुणे २) इरफान नासीर शेख २७ वर्षे, रा. सय्यदनगर, गल्ली नं १७, आयशा मस्जिद शेजारी, हडपसर पुणे हे अनुक्रमे वेताळबाबा वसाहत व सय्यदनगर भागात येणार असल्याची गोपनीय खबर पोलीस अंमलदार गणेश माने, नासेर देशमुख व परमेश्वर कदम यांना मिळालेली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी साजीद झिब्राइल नदाफ यास वेताळबाबा वसाहत मंदिराजवळून व इरफान नासीर शेख यास सय्यदनगर, आयशा मस्जिद शेजारील रोडवरुन कायदेशीर प्रक्रिया राबवुन ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक छगन कापसे, गुन्हे शाखा युनिट ०५, पुणे शहर, पोलीस उप निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार गणेश माने, नासेर देशमुख व परमेश्वर कदम यांचे पथकाने केली आहे.


