क्राईमताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजसामाजिक

वानवडी पोलीसांची मोठी कारवाई महिंद्रा टेम्पोचा पाठलाग करून १,१५० लिटर गावठी हातभट्टी दारुसह ४ आरोपीना ठोकल्या बेडया..


 

सहसंपादक  – फयाज शेख…

दि. २३/१२/२०२५ रोजी वानवडी पोलीस ठाणेकडील सपोनि उमाकांत महाडिक व तपास पथक असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार दया शेगर व अमोल पिलाणे यांना गुप्त बातमी मिळाली की, “हातभट्टीची गावठी दारु महिंद्रा टेम्पोतून वाहतूक होणार आहे.” अशा आशयाची बातमी मिळाल्याने मा. वरिष्ठांचे आदेशान्वये योग्य ती कार्यपध्दतीचा अवलंब करुन मिळालेल्या बातमीप्रमाणे गाडीचा वानवडी पोलीस ठाणे हद्दीत शोध घेत असताना महिंद्रा कंपनीचा टेम्पो नंबर एमएच.१२.एस.एक्स.४६६८ सोपानबाग घोरपडी, पुणे येथे जात असल्याची माहिती मिळाल्याने तेथे तपास पथकाने जाऊन सापळा रचुन नमुद संशयित वाहन ताब्यात घेतली असता त्यामध्ये चार इसम मिळून आले, त्यांचे नावे १) लियाकत रोहीत अब्बासी, वय ३२ वर्षे, धंदा दारु विक्री, रा. स.नं. ६६, ढोबरवाडी, रेल्वे पटरीच्या बाजुला, सोपानबाग, पुणे, २) श्रीकांत बापु साबळे, वय-२१ वर्षे, धंदा टेम्पो चालक, रा. सोरतापवाडी फाटा, ऊरळीकांचन, पुणे, ३) संकेत विजय वाबळे, वय १९ वर्षे, रा. हेल्पर, रा. महादेवनगर, सोरतापवाडी, ऊरळीकांचन, पुणे व ४) विशाल दुर्योधन संगोडिया, वय १८ वर्षे, रा. गाडामुडी गाव, खामगाव फाटाजवळ, यवत, पुणे अशी आहे.

 

दारु विक्री करणारा लियाकत अब्बासी याने सांगितले की, “पुणे शहरात गावठी हातभट्टी दारु मिळत नसल्यामुळे ती यवत येथुन दुर्योधन संगोडिया यांचेकडुन तयार हातभट्टी गावठी दारुचे कॅन्ड विकत घेऊन या टेम्पोमध्ये भरले व ते कोणालाही दिसु नये म्हणुन त्याला कुंडया व झांडाचा आडोशा घेऊन येथे आलो असल्याचे सांगितले. नमुद इसमाच्या ताब्यातील चारचाकी गाडीची तपासणी करता त्यामध्ये काळ्या, निळ्या रंगाचे प्लास्टीकचे ३५ लिटर क्षमतेचे दारुने भरलेले एकुण ३३ हत्ती केंन्ड असे एकुण १,१५० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु व त्याची वाहतुक करणेकामी वापरलेला मंहिद्रा कंपनीचा सुप्रो मिनी ट्रक व्ही. एक्स मॉडेलचा टेम्पो त्याचा आर.टी.ओ.नं. एम.एच.१२/एस. एक्स-४६६८ असा एकुण ५.६५.५००/-रु.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावरुन वानवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं. ५२०/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख हे करीत आहे.

 

*

 

सदरची कारवाई ही श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, पोलीस उप-आयुक्त सोो, परिमंडळ ०५ पुणे. शहर, नम्रता देसाई, सहा. पोलीस आयुक्त सोो, वानवडी विभाग, पुणे शहर व श्री. भाऊसाहेब पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व संगीता जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) वानवडी पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, उमाकांत महाडिक व पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, आशिष कांबळे, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विष्णु सुतार, अभिजित चव्हाण, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले, अर्षद सय्यद, या विशेष पथकाने केली आहे.


Translate »
error: Content is protected !!