क्राईमताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजसामाजिक

भाडेकरूंची माहिती पोलीसांना सादर न करणाऱ्या घरमालकाविरोधात लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल


सहसंपादक – फयाज शेख…

मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३(३) प्रमाणे घरमालक यांनी भाडेकरु ठेवताना तसेच खाजगी मालक यांनी नोकर भरती करताना सुरक्षीतते बाबत दक्षता घेणे करीता सदरची माहिती पोलीसांना कळविणे बंधनकारक असले बाबत आदेश काढलेले असुन त्याबाबत पोलीस विभागातर्फे वेळोवेळी प्रसार माध्यमाव्दारे त्याची प्रसिध्दी करण्यात आली आहे.

सध्या दिल्ली येथे झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या अनुषंगाने लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात भाडेकरुं बाबत माहिती तसेच हद्दीमधील हॉटेल, लॉजेस मर्मस्थळे व गर्दीचे ठिकाणी भेटी देण्यासाठी वरिष्ठांचे आदेशाने पोलीस स्टेशन स्तरावर पथक निर्माण करण्यात आलेले आहे. दिनांक १९/११/२०२५ रोजी इसम नामे अफसर अहेसान अन्सारी याच्याकडे ब्राउन रंगाची मॅफेड्रॉन (एम.डी.) मिळुन आले होते. त्यांचे काळभोर हाईट्स, पाषाणकर बाग, लोणी काळभोर, हवेली, पुणे येथील राहत्या घरी अधिक चौकशी केली असता सदरचा आरोपी हा भाडेतत्त्वावर राहण्यास असुन त्यांचे घरमालक यांनी त्यांचे इमारतीमध्ये एकुण १७ भाडेकरू ठेवलेले होते. ठेवण्यात आलेल्या भाडेकरूंची माहिती पोलीसांना कळविणे बंधनकारक असताना ही सदरची माहिती कळविली नसल्याने त्यांचे विरुध्द लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन पुढील तपास सुरु आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. श्री. राजकुमार शिंदे, मा. सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र पन्हाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकाळभोर पोलीस ठाणे पुणे शहर, पोलीस हवा. रवि आहेर, संदीप जोगदंड, बापु वाघमोडे यांचे पथकाने केली असुन त्यामध्ये अधिक तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे.

लोणीकाळभोर पोलीस ठाणेचे वतीने आवाहन करण्यात येते की, ज्या घरमालकानी भाडेकरु ठेवलेले आहेत. त्यांनी भाडेकरूंची माहिती तसेच खाजगी मालक यांनी नोकर भरती करताना सुरक्षीतते बाबत दक्षता घेणे करीता सदरची माहिती भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १६३ (३) प्रमाणे पोलीसांना देणे बंधनकारक असल्याने सदरची माहिती सादर करावी.


Translate »
error: Content is protected !!