वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांची धडाकेबाज कामगिरी रस्त्याने जाणा-या जेष्ठ नागरिकाला निर्जनस्थळी गाठून लुटणा-या चोरास केले जेरबंद

मुख्य संपादक – जोसेफ नडेसन…
दि.१२/१२/२०२५ रोजी मधुबन सोसायटीकडुन हिलसाईड अपार्टमेंटकडे जाणारे रोडवर टेकडीचे जवळ रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया रामटेकडी हडपसर पुणे येथे चार अनोळखी आरोपीतांनी एका वयोवृध्द इसमाला टेकडीजवळील निर्जन रस्त्यावर चालत जात असताना अडवून त्यांना हाताने मारहाण करुन त्यांचे गळयातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन ही जबरदस्तीने ओढुन घेवुन एका मोटारसायकलवरुन तेथुन निघुन गेले होते त्यावरुन वयोवृध्द इसमाने दिलेल्या फिर्यादीवरुन वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ५०६/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.
वानवडी पोलीस ठाणेकडील तपासपथक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी वरिष्ठांचे आदेशाने व मार्गदर्शनाखाली दाखल गुन्हयाचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज चेक करुन, त्यामधील संशयीत इसमांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान दि.१८/१२/२०२५ राजी तपास पथकातील पोलीस अंमलदार विष्णु सुतार, विठ्ठल चोरमले व अभि चव्हाण यांना त्यांचे खास बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, दि.१२/१२/२०२५ रोजी हिलसाईड अपार्टमेंटकडे जाणारे रोडवर टेकडीचे जवळ रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया रामटेकडी हडपसर पुणे येथे एका वृध्द इसमाला अडवुन हाताने मारहाण करुन त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावुन चोरी करुन घेवुन जाणारे चार इसमांपैकी एक इसम हा सध्या गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळील ओढ्यावरील छोट्या पुलावर निर्जन ठिकाणी त्याचेकडील अॅक्टीवा गाडीवर कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे.” अशी बातमी मिळाल्याने वानवडी पोलीस ठाणे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व स्टाफ असे दोन पंचांसह बातमीचे ठिकाणी जावुन संशयीत इसमास शिताफीने पकडुन त्याचा नाव पत्ता विचारला असता त्यांने त्याचे नाव उमर नुर खान वय १८ वर्षे रा. नवाधिश पार्क कोंढवा पुणे असे असल्याचे सांगितले त्याचे अंगझडतीमध्ये त्याचे पॅन्टचे खिशात अंदाजे १५ ग्रॅम वजनाची सोन्यासारखी दिसणारी पिवळया धातुची चैन मिळुन आली. सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेने त्याचेकडे असणारी नमुद चैन व मोटारसायकल ही गुन्हयाचे कामी जप्त करुन ताब्यात घेतली असुन नमुद आरोपीतास दाखल गुन्हयात अटक केले आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर श्रीमती नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. भाऊसाहेब पाटील, वानवडी पो. स्टे. पुणे शहर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता जाधव, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व पोलीस अंमलदार अतुल गायकवाड, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, विष्णू सुतार, विठ्ठल चोरमले, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, आशिष कांबळे, बालाजी वाघमारे अर्शद सय्यद व महिला पोलीस अंमलदार रुपाली खेडकर, शैला ठेंगल या पथकाने केली आहे.


