खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर देशी बनावटीचे ०२ पिस्टल व ०१ जिवंत काडतुसे बाळगणा-या ०२ इसमांना केले जेरबंद

सहसंपादक – फयाज शेख..
खंडणी विरोधी पथक २. गुन्हे शाखा, पुणे शहर पोलीस निरीक्षक, श्रीमती वर्षा देशमुख, यांचे देखरेखी खाली खंडणी पथक माहिती काढीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील व पवन भोसले यांना माहिती मिळाली की, ०७ महिन्यापासुन लोणीकाळभोर पोलीस स्टेशनकडील गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे शुभम कैलास कामठे, वय ३० वर्षे, रा. कदम वाक वस्ती, जिल्हा परिषद शाळेच्या मागे, लोणी काळभोर पुणे. यास सापळा रचुन ताब्यात घेतले असता त्याचे कमरेला ०१ गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस मिळून आले. तसेच त्याचे सोबतचा इसम नामे शुभम श्रीमंत रसाळ, वय १९ वर्षे रा. पावर हाऊस शेजारी फुरसुंगी पुणे याचे कमरेला ०१ गावठी पिस्टल असा एकूण ८०,५००/- रुपये किंमतीचे ०२गावठी पिस्टल व ०१ जिवंत काडतुस बेकायदेशिररित्या स्वतःजवळ बाळगला असताना मिळून आले. नमुद आरोपी यांचेविरुध्द बेकायदेशिर अग्निशस्त्र बाळगले म्हणुन फुरसुंगी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४३६/२०२५ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ (२५), सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी शुभम कैलास कामठे याचेविरुध्द पुणे शहर हद्दीत विविध प्रकारचे ०८ गंभीर गुन्हे दाखल आहे. लोणीकाळभोर पोलीस स्टेशनकडील आर्म अॅक्ट गुन्ह्यात मागील ०७ महिण्यापासुन पसार होता.
सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शानाखाली खंडणीविरोधी पथक २. गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा देशमुख व पोलीस उप-निरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार अजिनाथ येडे, दिलीप गोरे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, किरण पड्याळ, अमोल राऊत, आझाद पाटील, पवन भोसले, गणेश खरात, प्रशांत शिंदे यांनी केलेली आहे.


