क्राईमताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजसामाजिक

बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर दरोडयाची तयारी करणा-या सराईत आरोपींना ताब्यात घेवुन त्याचे कडुन दरोडयाचे साहित्य व चोरीचे मोबाईल फोन असा एकुण ३२,१६०/-रु. किं. चा मुद्देमाल केला हस्तगत


मुख्य संपादक  – जोसेफ नडेसन..

बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे आदेशान्वये तपास पथकातील अधिकारी पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता व तपास पथकातील अंमलदार असे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार कृष्णकांत श्रीराम, ज्ञानेश्वर गायकवाड व राजु धुलगुडे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, जुने रेल्वे सिमेंट गोडाऊन, मालधक्का चौक पुणे येथे काही इसम दारोडा टाकण्याच्या तयारीत थांबलेले आहेत अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने मिळालेल्या बातमी प्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता व तपास पथकातील स्टाफ सदर ठिकाणी जावुन इसम नामे १) जानमोहम्मद नसरुद्दीन शेख, वय ३२ वर्षे, रा. पीर वस्ती, गायकवाड फार्म हाऊस समोर, वडकी, पुणे २) सतिष ज्ञानेश्वर शिरोळे, वय ३५ वर्षे, रा. पुणे स्टेशन फिरस्ता, मुळ रा. मु. पो. दहीटणे, तालुका दौंड, जिल्हा पुणे ३) शिव प्रकाश कुमार वय २३ वर्षे, रा. स्वारगेट कॅनाल, पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यात दरोड्याचे साहित्य व ०६ मोबाईल फोन मिळून आल्याने ते जप्त करुन त्यांचे विरुध्द बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. ३५२/२०२५ भा.न्या.सं.क. ३१० (४), ३१० (५), आर्म अॅक्ट ४ (२५), म.पो.अधि. क. ३७ (१) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. नमुद आरोपीतांना दि.१८/११/२०२५ रोजी अटक करण्यात आलेली आहे.

दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान आरोपीतांकडुन बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. ३५०/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०९ (६), ३(५) प्रमाणे दाखल गुन्हा उघडकीस आणुन आरोपीतांकडुन एकुण ३२,१६०/-रु. किं. चे दरोडयाचे साहित्य व ०६ चोरीचे मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्री. राजेंद्र बनसोडे, गा. पोलीस उप आयुक्त परि-२, पुणे शहर श्री. गिलिंद गोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त लष्कर विभाग श्रीमती संगिता आल्फान्सो शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पांढरे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. निलकंठ जगताप यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, कृष्णकांत श्रीराम, सुर्यकांत राणे, महेश जाधव, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड व राजु घुलगुडे यांनी केली आहे.


Translate »
error: Content is protected !!