कृषीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी ‘ॲग्रीस्टॅक’ ला गती; जाणून घ्या, योजना नेमकी काय, अंमलबजावणी कशी होणार
पीकविमा योजनेसह कृषी विभागाच्या विविध योजनांमधील वाढता भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेला राज्यात बळ दिले जात आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील ३८ लाख ५८ हजार ७०२ शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राने शेतकरी ओळखपत्र देण्यात आघाडी घेतली आहे.



