मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची दक्षिण मध्ये प्रभावी अंमलबजावणी
आ. सुभाष बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण सोलापूरमध्ये भाजपाचे विशेष अभियान सुरु केले असून लाडक्या बहिणींसाठी आज प्रभाग 26 मधील कल्याण नगर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व नवीन मतदार नाव नोंदणी अभियानसाठी विशेष शिबिर घेण्यात आले होते. यावेळी असंख्य महिला भगिनींनी लाभ घेतला. यावेळी मंडळ अध्यक्ष आनंद बिराजदार, दीपक जमादार, विधानसभा विस्तारक डॉ. शिवराज सरतापे, अमोल गायकवाड आधी उपस्थित होते.



