पूर्व हवेली तालुक्याची अस्मिता आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आर्थिक गणित जुळवण्यासाठी यशवंत सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू होणं ही काळाची गरज आहे .
लोणी काळभोर प्रतिनिधी – पूर्व हवेली तालुक्याची अस्मिता आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आर्थिक गणित जुळवण्यासाठी यशवंत सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू होणं ही काळाची गरज आहे . याची जाणीव अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना असल्यामुळे सध्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कारखान्याच्या सभासदांकडून घरोघरी या उमेदवारांचे उत्साहात स्वागत केले जात आहे आणि पाहुणचार करण्याबरोबरच औक्षण करून पुन्हा यशवंत सुरू करण्यास हातभार लावण्याची हमी ही घेतली जात आहे .
यशवंत सहकारी साखर कारखाना पूर्ववत सुरू होण्यासाठी पांडुरंगआप्पा काळे यांनी न्यायालयीन लढाई लढली त्यामुळे सभासदांना कारखाना सुरू होण्याची आस लागली होती. आज पूर्व हवेली पट्ट्यामध्ये आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी आणि परिसरात पिकणारा चार ते साडेचार लाख टन ऊस गाळप करण्यासाठी हक्काचा यशवंत पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे. यामुळे सभासदांनी यावेळी आमचं ठरलंय ‘यशवंत’ची चिमणी उघड्या डोळ्यांनी पेटलेली पाहिजे असा संकल्प केला असल्याची भूमिका सभासदांनी घेतली असून स्वच्छ प्रतिमा गतिमान विचार आणि आश्वासक कार्य असलेल्या उमेदवारांच्या पाठीमागेच हे राहण्याची भूमिका सभासदांनी घेतली आहे.
सध्या ज्यांच्यामुळे कारखाना दिवाळखोरीत गेला त्यांच्याच लोकांच्या गाड्या चला पुन्हा यशवंत सुरू करूच्या वल्गना करत असून हे लबाडा घरचं आवताणं याला बळी पडायचं नाही ही अशीच भूमिका सभासदांची असून सभासदांनीच यशवंत वाचवण्याचा दृढनिश्चय केला आहे. ज्या पांडुरंग आप्पांनी हा कारखाना वाचवण्यासाठी जीवाचं रान आणि प्रयत्नाची परराष्ट्र केली त्यांना साथ देण्याचा मानस सभासदांनी केला आहे.
आज तालुक्यातील सर्व तरुण पिढी जिवाच्या आकांताने हा यशवंत पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असताना सभासदही त्यांना तेवढीच उत्साही साथ देत असल्याचं वातावरण सध्या प्रचारात दिसत आहे. आज ही तरुणपिढी प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर, बाळासाहेब चौधरी
यांच्यासह यशवंत सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी एकत्र आल्याचा आनंदही या प्रचाराच्या दरम्यान सभासदांच्या चेहऱ्यावर दिसत असल्याचे उमेदवारांनी प्रचारादरम्यान माध्यमांशी बोलताना सांगितले. अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांचे सर्व सभासदांकडून उत्साही स्वागत केले जात आहे.



