पोलीस पाटलानेच केली प्रशासनाची फसवणूक
बारामती: बारामती तालुक्यातील गोजुबावी येथील पोलीस पाटलाने गेल्या एक वर्षापासून केवळ पोलीस प्रशासनाचीच नव्हे तर महसूल खात्याचे देखील डोळ्यात धुळ फेकली आहे.
सदर पोलीस पाटलास अनुक्रमे पहिले दोन मुली आहेत व तो गेली दहा वर्षे पदावर काम करत आहे .
मागील वर्ष जून 2023 मध्ये सदर पोलीस पाटलास तिसरे अपत्य मुलगा झाला आहे. या प्रकरणात प्रशासनाला वारंवार तक्रार करून देखील कळवण्यात आले होते. परंतु प्रशासनातील काही कर्मचारी तफ्तर दिरंगाई करत आहेत.
सदर पोलीस पाटलाचे दहा वर्षानंतर होणारे नूतनीकरण अहवाल तीन अपत्य असल्याचे तक्रार असताना देखील पोलिस कार्यालयातून देण्यात आला.
सदर प्रकरणात प्रांताधिकारी कार्यालयाने तक्रारदारास पुराव्यानीशी अर्ज करावा असे सांगण्यात आले होते.
या संपूर्ण प्रकरणे पोलीस पाटलाने प्रशासनाचे सरळ सरळ फसवणूक केल्याचे दिसून येत आहे याप्रकरणी दोषी असणाऱ्या या पोलीस पाटलावर कोणाचा वरदहस्त आहे का याविषयीची चर्चा वर्तुळात सर्वत्र होत आहे.
प्रशासन नेमके कारवाई काय करणार आणि कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.



