युनिट ६ गुन्हे शाखा, पुणे शहर हरवलेले मोबाईल फोन हस्तगत करून मुळ मालकास परत मिळवुन दिले

सहसंपादक- फयाज शेख
मा. वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे हरवलेले जास्तीत जास्त मोबाईलचा शोध घेणे कामी युनिट ६ कबील पोलीस हवालदार सारंग वळे व महिला पोलीस अंमलदार सोनाली नरवले यांनी सीईआर पोर्टलवरील माहिती संकलित केली. संगणक विभागाचे महिला पोलीस अंमलदार तरंगे यांचे मदतीने मिसिंग मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून वाघोली पोलीस स्टेशन, लोणीकंद पोलीस स्टेशन, लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे हद्दीतील हरविलेले वेगवेगळ्या कंपनीचे अंदाजे ५,११,०००/-रु. किंमतीचे एकुण २५ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहे. सदरचे मोबाईल फोन हे त्यांचे मूळ मालकास परत देण्याची कारवाई सुरु आहे
सदरची कामगीरी मा अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे श्री राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री वाहीच पठाण गुन्हे शाखा युनिट, वांचे सुचनांप्रमाणे मुनी शाखा, युनिट काहील पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, सारंग वळे, गिरीष नागणेकर, सचिन पवार, निर्णय सांडे, विनायक साळवे, नेहा तापकीर, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कोती मांदळे व सोनाली नरवडे यांनी केली आहे.


