पुणे – बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघाताने हाहाकार माजला आहे
मुख्य संपादक – जोसेफ नदेसन
आज गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दोन कंटेनर आणि एका कारचा जबरदस्त अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही कंटेनरना अचानक आग लागली असून त्यांच्या मधोमध एक कार अडकली. या कारमध्ये प्रवास करणाऱ्या काही लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या अपघातात 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण प्राथमिक माहितीनुसार 3 जणांचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.


