क्राईमताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

फुरसुंगी पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजि. क्र.३९०/२०२५ भा.न्या. सं कलम १३७ (२) मधील अपहृत मुलगीचा शोध घेवून सदर मुलीस तिचे मामाच्या ताब्यात सुखरुप दिले बाबत


सहसंपादक – फयाज शेख 

फुरसुंगी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.क्र.३९०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) प्रमाणे दिनांक १९/११/२०२५ रोजी अल्पवयीन मुलगी वय १३ वर्षे ७ महिने हीस कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केले आहे असा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास मा. वरिष्ठांचे आदेशाने व सुचनेप्रमाणे पोउनि विनोद पवार व पोलीस अंमलदार ४२२७ शिंदे व ५०२२ गावडे हे करत होते. सदर मुलीकडे मोबाईल नसल्याने ती कोठे गेली आहे किंवा तिचे कोणी अपहरण केले. याबाबत काही एक माहीती मिळत नव्हती सदर मुलीचा शोध घेत असताना बातमी मिळाली सदर मुलगी ही मगरपट्टा, हडपसर, पुणे या परिसरात दिसुन आली अशी गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली. सदर बाब मा. वरिष्ठांचे निदर्शनास आणून त्यांचे परवानगीने मिळालेल्या माहितीची खातर जमा करणेकरीता सदरची माहीती तात्काळ वरिष्ठांना देवुन वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ फुरसुंगी पोलीस स्टेशनचे पोउनि विनोद पवार व पोलीस अंमलदार ४२२७ शिंदे व ५०२२ गावडे असे पथक मगरपट्टा, हडपसर, पुणे येथे पाठवण्यात आले असता सदरची मुलगी ही हडपसर मुढंवा रोड, मगरपट्टा येथे असलेबाबत खात्री झाली असता सदर मुलीस ताब्यात घेवुन चौकशी केली असता तिने घरकामात आईला मदत केले नाही म्हणुन आई रागावल्याने ती राहते घरुन निघुन गेली आहे असे सांगीतले.

मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस पथकाने तपासामध्ये काहीएक सुगावा नसताना कसोशिने तपास करून सदर मुलीचा शोध घेतला आहे.

वरील कामगिरी मा.डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपआयुक्त परि.-५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर, मा. अमोल मोरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन, पणे शहर, यांचे सुचने प्रमाणे पोउनि विनोद पवार, पोशि/४२२७ शिंदे व पोशि/५०२२ गावडे सर्व नेमणुक फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी प्रशंसनीय व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

वरील गुन्हयाचा तपास फुरसुंगी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार हे करत आहेत.


Translate »
error: Content is protected !!