क्राईमताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजसामाजिक

फुरसुंगी पोलीसांकडून अंतरराज्यीय चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद, चोरटयाचे बँकखाती चोरीतील असलेली ५,००,०००/- रुपयांपेक्षा जास्त रक्कम फ्रिज व चोरी करणेकरीता वापरलेली १,३४,७८० रुपये किंमतीची साधने, मोटारसायकल जप्त


       सहसंपादक  – फयाज शेख..

फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर गु.र.क्र. ४०७/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ (४), ३२४(२) अन्यये दि.२८/११/२०२५ रोजी फिर्यादी विशाल यादव, रा. मळाईपार्क, फुरसुंगी, पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयातील घटनास्थळी व आजुबाजूस असलेल्या पत्र्याचे शेड असलेल्या दुकानामध्ये यापूर्वी ऑगष्ट २०२५ मध्येही अशाच प्रकारची घटना होऊन अंदाजे चार लाख रुपये चोरी झाले होते, त्याबाततही फुरसुंगी पो.स्टे. गु.र.नं. २४२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१ (३), ३३१ (४) व गुन्हा रजि. नं. २४३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३३१(३). ३३१ (४) प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. एकाच ठिकाणी दोनदा चोरीची घटना घडल्याने पोलीसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी कंबर कसुन सर्वतोपरी शोध घेऊ लागले. परिसरातील सीसीटीव्ही, गोपनिय बातमीदार यांचेकडून माहिती घेतली. चोरी करणारा अज्ञात आरोपीचा सीसीटीव्ही फुटेजवरून मिळालेल्या वर्णनाचे इसमांकडे तपास करण्यात येत होता. अज्ञात आरोपीचा शोध घेणे पोलीसांपुढे आव्हान निर्माण झाले होते.

फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांचे मार्गदर्शनामध्ये तपास पथक प्रभारी विष्णु देशमुख व त्याचे पथक अथक परिश्रम करून आरोपीचा माग काढत असताना पोहवा नितीन गायकवाड, पो.अं. हेमंत कामथे यांना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, बरील गुन्हयातील प्राप्त सीसीटीव्ही फुटेजमधील चोरी करणारे वर्णनाचा एक इसम संशयीलपणे भेकराईनगर बसस्टॉपसमोर, पुणे सासवड रोड, फुरसुंगी, पुणे येथे उभा आहे. प्राप्त बातमी मा, वरिष्ठांना देवून त्यांचे आदेशाने बातमीचे ठिकाणी तपास प्रभारीसह पोलीस अमलदार असे तात्काळ जावून भेकराईनगर बसडेपोचे बाजुचे परिसरामध्ये शोध घेतला. संशयीत इसमास पोलीसांची चाहूल लागताच तो पळून जाण्याचे तयारीत असताना दि.०१/१२/२०२५ रोजी ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाय महेश लक्ष्मीकांत पुजारी, वय २१ वर्षे, रा. मु.पो. हत्तीकनबस, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर, असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे येथे येण्याचे कारणाबाबत तपास केला असता त्याने प्रथम उड़वा उडवीची उत्तरे दिली. त्याचेकडे विश्वासात घेवून गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्याने गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासामध्ये ताब्यातील निष्पन्न आरोपी महेश पुजारी याने यापुर्वीही त्याच ठिकाणी चोरी केली असून त्यातील आलेली रोख रक्कम मौजमजेसाठी खर्च करून उर्वरीत पैसे त्याचे बँकखाती जमा केले असल्याची माहिती मिळाली आहे. त्याप्रमाणे आम्ही त्याचे बँकखातेची माहिती घेतली असता त्याचे बँकखाती ५,००,०००/- रुपयेपेक्षा (पाच लाख रुपये) जास्त रक्कम असून ती चोरीतील असल्याची खात्री झालेने त्याचे बँक खाते फ्रिज केले आहे. आरोपीने चोरी करण्याकरीता वापरलेली साधने त्यामध्ये स्कू ड्रायव्हर, लोखंडी पाने, पक्कड, कपडे, होंडा शाईन दुचाकी असे एकुण १,३४,७८०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीकडून फुरसुंगी पोलीस स्टेशनकडील यापुर्वीचे दोन गुन्हयांची उकल करण्यात फुरसुंगी पोलीसांना यश आले आहे. सराईत आरोपीविरुध्द यापुर्वी अक्कलकोट, सोलापूर, हुबळी (कर्नाटक) येथे एकुण ०८ गुन्हे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वरील आरोपीचे तपासकामी तपास पथकातील तांत्रिक विश्लेषण काम पाहणारे पो. हवा श्रीनाथ जाधव यांनी महत्वाची भुमिका पार पाडली आहे. गुन्हयाचा पुढील तपास विष्णु देशमुख, पोलीस उप निरीक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करत आहे.

सदरची कामगिरी ही मा. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त सो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, अमोल मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर, राजेश खांडे, पोनि, (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक विष्णू देशमुख, पो. हवालदार नितीन गायकवाड, हरिदास कदम, सागर वणवे, श्रीनाथ जाधव, पोलीस अंमलदार हेमंत कामथे, अभिजित टिळेकर, योगेश गायकवाड, विनायक पोमण, नितीन सोनवणे यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.


Translate »
error: Content is protected !!