क्राईमताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजसामाजिक

घरफोडी करणारा सराईत आरोपी अटक, गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे दागिने जप्त.


मुख्य संपादक – जोसेफ नडेसन…

बाणेर पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात दि. ०८/०९/२०२५ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०१:०० वा च्या सुमारास लेन नं ११, विरभद्रनगर, बाणेर पुणे येथील फिर्यादी यांचे राहत्या घराचा दरवाजा कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या परवानगीशिवाय चोरीच्या उद्देशाने कशाच्यातरी सहाय्याने तोडुन घरात प्रवेश करुन फिर्यादीच्या घरातील लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे ४.५ तोळे वजनाचे मंगळसुत्र व ५०,०००/- रोख रक्कम लुबाडीच्या इरादयाने चोरुन नेल्याने बाणेर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. २०८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३०५(अ), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर दाखल गुन्हयातील आरोपीचा बाणेर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय बातमीदारामार्फत, विशेष कौशल्याचा वापर करुन व एकुण ८८ सीसीटीव्ही फुटेज चेक करुन काळेवाडी पिंपरी चिंचवड येथुन आरोपी क्र. १) साहील रविंद्र वाघमारे वय २३ वर्ष धंदा चहा हॉटेल रा. हरदेव कॉलनी विजय नगर, काळेवाडी सन १०८ पुणे २) शाकिब छोटूशेख यय २६ वर्ष धंदा. रिक्षाचालक रा. संजयगांधीनगर काळेवाडी ब्रिजजवळ, गुप्ता किराणा स्टोअर्स जवळ पुणे यांना दि. १७/०९/२०२५ रोजी अटक केली होती. अटक आरोपीच्या ताब्यातुन गुन्ह्यात वापरलेली स्पॅल्डर मोटार सायकल व तसेच चोरी केलेल्या पैशांमधुन नगदी ३८,०००/- रु जप्त केले होते. गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे चेतन उर्फ चेत्या काकासाहेब वाघमारे, वय-२७ वर्षे, धंदा-सध्या काही नाही, रा. विजयनगर, अल्फान्सो शाळेसमोर, माया मार्केटजवळ, साई गोटा, काळेवाडी, पुणे हा फरार होता. नमुद आरोपीस दि. १४/११/२०२५ रोजी ताब्यात घेवुन त्याचा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करुन आरोपीकडे अधिक तपास करुन गुन्ह्यामध्ये चोरी केलेले ४० ग्रॅम १४० मीली ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र जप्त करुन सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे. अटक आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द चोरी जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न व मारहाण व शस्त्र अधिनियम नुसार विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. श्री. सोमय मुंडे, पोलीस उपआयुक्त, परि. ४, पुणे शहर, मा. श्री. विठ्ठल दबडे सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर, यांचे सुचने व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. चंद्रशेखर सावंत, अलका सरग पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि कैलास डाबेराय, सपोनि गणेश रायकर, पोउपनि दिपाली पाटील पोहवा ६७०१ बाबा आहेर, पोहया ६६७४ किसन शिंगे, पोहवा २३४३ गणेश गायकवाड, पोहवा ७३५६ निकाळजे, पोशि ८१४५ अतुल इंगळे, पोशि २४४१ गजानन अवातिरक, पोशि १०४०४ प्रदिप खरात, पोशि ८४१५ प्रितम निकाळजे, पोशि ४५१ शरद राऊत, पोशि ३९०५ रोहीत पाथरुट, पोशि २३९५ मराठे सर्व नेमणुक बाणेर पोलीस ठाणे पुणे शहर यांनी केली आहे.


Translate »
error: Content is protected !!